Posts

तालुक्यातील 27 ग्रामपंचायती निकालावर केले अनेकांने दावे!निंबोणी ग्रामपंचायत मध्ये घोगरे सर्वाधिक मतांनी विजयी! प्रशांत साळे यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेसला आले बळ!

Image
  मंगळवेढा(प्रतिनिधी) तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले त्यामध्ये तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व असल्याचा दावा केला. निंबोणी ग्रामपंचायतीमध्ये बिरदेव घोगरे हे तालुक्यात सर्वाधिक 906 मताने विजयी झाले.          आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय नेत्यांनी गाव पातळीवरील कौल मिळण्यासाठी  समर्थन दिले. तहसीलदार मदन जाधव व निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगे यांनी मतमोजणीचे उत्कृष्ट नियोजन केले होते काही ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर झाले तर हिवरगाव (प्रदीप खांडेकर)चिखलगी (नितीन पाटील),जालीहाळ(सचिन चौगुले), आंधळगाव, अकोला येथे सदस्याचे उमेदवार चिट्ठीवर विजयी झाले. या ग्रामपंचायत मध्ये सत्ताधाऱ्यांनी आपले गड राखले त्यामुळे निकाल नंतर सर्वच राजे सरपंच सदस्यांनी सर्वच राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्याला हजेरी लावत आम्ही तुमचेच आहे असल्याचा दावा केला. आ.समाधान आवताडे बीआरएसचे भगीरथ भालके, राष्ट्रवादी काँग्रेस अभिजीत पाटील, ज्येष्ठ नेते बबनराव अवताडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनी विज