Posts

मंगळवेढ्यात बसवेश्वर स्मारकासाठी सह्यांची लाट

Image
  मंगळवेढा(प्रतिनिधी) सामाजिक समतेचे आद्य प्रवर्तक जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचे मंगळवेढा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक उभारावे, या मागणीसाठी मंगळवेढेकरांच्यावतीने व्यापक सह्यांची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मुरलीधर चौक येथे सकाळी १० ते रात्री ८ यावेळेत ही सह्यांची मोहीम आयोजित करण्यात आली होती. आम्ही मंगळवेढेकर स्मारकाचे होणार साक्षीदार या भावनेतून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विविध क्षेत्रातील नागरिक, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक यांनी उपस्थित राहून या मागणीला पाठिंबा दर्शवला. अनेकांनी ही केवळ स्मारकाची मागणी नसून सामाजिक समतेच्या विचारांचा गौरव असल्याचे मत व्यक्त केले. मंगळवेढेकरांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सात दिवसांच्या स्मारक प्रबोधन सप्ताहा अंतर्गत ही सह्यांची मोहीम राबविण्यात आली. या सप्ताहादरम्यान नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. महात्मा बसवेश्वरांचे विचार, त्यांचे समाजकारण आणि समानतेचा संदेश याबाबत माहिती दे...

तालुक्यातील 27 ग्रामपंचायती निकालावर केले अनेकांने दावे!निंबोणी ग्रामपंचायत मध्ये घोगरे सर्वाधिक मतांनी विजयी! प्रशांत साळे यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेसला आले बळ!

Image
  मंगळवेढा(प्रतिनिधी) तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले त्यामध्ये तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व असल्याचा दावा केला. निंबोणी ग्रामपंचायतीमध्ये बिरदेव घोगरे हे तालुक्यात सर्वाधिक 906 मताने विजयी झाले.          आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय नेत्यांनी गाव पातळीवरील कौल मिळण्यासाठी  समर्थन दिले. तहसीलदार मदन जाधव व निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगे यांनी मतमोजणीचे उत्कृष्ट नियोजन केले होते काही ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर झाले तर हिवरगाव (प्रदीप खांडेकर)चिखलगी (नितीन पाटील),जालीहाळ(सचिन चौगुले), आंधळगाव, अकोला येथे सदस्याचे उमेदवार चिट्ठीवर विजयी झाले. या ग्रामपंचायत मध्ये सत्ताधाऱ्यांनी आपले गड राखले त्यामुळे निकाल नंतर सर्वच राजे सरपंच सदस्यांनी सर्वच राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्याला हजेरी लावत आम्ही तुमचेच आहे असल्याचा दावा केला. आ.समाधान आवताडे बीआरएसचे भगीरथ भालके, राष्ट्रवादी काँग्रेस अभिजीत पाटील, ज्येष्ठ नेते बबनराव ...