Posts

Showing posts from April, 2026

मंगळवेढ्यात बसवेश्वर स्मारकासाठी सह्यांची लाट

Image
  मंगळवेढा(प्रतिनिधी) सामाजिक समतेचे आद्य प्रवर्तक जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचे मंगळवेढा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक उभारावे, या मागणीसाठी मंगळवेढेकरांच्यावतीने व्यापक सह्यांची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मुरलीधर चौक येथे सकाळी १० ते रात्री ८ यावेळेत ही सह्यांची मोहीम आयोजित करण्यात आली होती. आम्ही मंगळवेढेकर स्मारकाचे होणार साक्षीदार या भावनेतून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विविध क्षेत्रातील नागरिक, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक यांनी उपस्थित राहून या मागणीला पाठिंबा दर्शवला. अनेकांनी ही केवळ स्मारकाची मागणी नसून सामाजिक समतेच्या विचारांचा गौरव असल्याचे मत व्यक्त केले. मंगळवेढेकरांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सात दिवसांच्या स्मारक प्रबोधन सप्ताहा अंतर्गत ही सह्यांची मोहीम राबविण्यात आली. या सप्ताहादरम्यान नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. महात्मा बसवेश्वरांचे विचार, त्यांचे समाजकारण आणि समानतेचा संदेश याबाबत माहिती दे...